<<< Home Books Audio Books>>>
प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन-कार्यावरील ही प्रत्ययकारी कादंबरी. सुमारे ३ वर्षं राजेन्द्र खेर भिन्न भिन्न वेळी पू. दादाजींबरोबर बसले आणि त्यांचं जीवन त्यांनी जाणून घेऊन ही मोठी कादंबरी सिद्ध केली. पू. पांडुरंगशास्त्रींनी एक आचार, एक उपचार आणि एक उपासना पद्धती देऊन विशाल स्वाध्याय परिवार निर्माण केला. लाखो लोकांची जीवनं त्यांनी उजळून टाकली. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानसन्मान देऊन त्यांचा गौरव केला गेला. भक्तीवर आधारलेल्या त्यांच्या या मानवतेच्या कार्यामागील व्यथा आणि त्या अनुषंगानं अनेक प्रसंग या रसिकमान्य चरित्रात्मक कादंबरीत रेखाटले आहेत.
प्रभु श्रीरामांच्या जीवनावरील वाल्मीकी रामायणावर आधारित ऐतिहासिक कादंबरी
Buy - Hard copy eBook Audio book
अनेक प्रकारच्या संकटांनी, दुःखांनी, अनिश्चिततेने जगभरचा समाज ग्रासलेला असताना जीवन सुंदरतेने जगण्याची प्रेरणा देणारे हे 'आनंदाचे झाड'. सुखाचे विषय हे व्यक्तिसापेक्ष असतात. आनंद ही मात्र आत्म्याची एकमात्र भावना असते. कालाधीन जीवन सुंदर करण्यासाठी जीवनाचा उद्देश, मिळालेले गुण, आणि गंतव्य ठिकाण यांविषयी सारासार विवेक केला तर, आहे ते जीवन सुंदरतेने जगता येतं आणि आनंदमार्ग प्रकाशित होत जातो! दैनंदिन जीवन सुंदरतेने जगतानाच आत्मिक आनंदाकडे जाण्याचे अनुभवनिष्ठ दर्शन साध्या साध्या गोष्टी-घटनांमधून घडवण्याचा प्रयत्न करणारं हे रसिकमान्य पुस्तक आहे.
Buy - Hard copy eBook
भग्वदगीतेवरील ही वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. महाभारताची पार्श्वभूमी, अनेक प्रसंग, पूर्वपीठिका आणि कृष्णार्जुनांचे प्रत्ययकारी संवाद. कृष्णार्जुनांबरोबरच्या सान्निध्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारी रसिकमान्य कादंबरी.
Buy - Hard copy eBook Audio book
Awakening Your Bliss
"Awakening Your Bliss" provides a gradual progression, sensitizing and educating readers on the profound principles of spiritual awakening. The wisdom imparted by the revered Gurus offers invaluable guidance to navigate the complexities of this spiritual journey.
सुख, समाधान, उल्हास, अशा दैहिक भावनांच्या पलीकडे गेल्याशिवाय अ-क्षय आनंदाची दिशा सापडत नाही. स्वयंशिस्त, भावनांवर नियंत्रण, ईश्वराची उपासना, आणि नामः स्मरणरूपी साधनेच्या प्रकाशात आत्मशोधाची वाट चालू लागलो की, मन व बुद्धी स्थिर होऊ लागते. आणि मग आपल्यातच दडलेला आत्मानंदाचा प्रकाश मनभर आणि नंतर आजूबाजूसही पसरू लागतो. मनुष्यजन्माला आलेल्या प्रत्येकाने जन्म ते मृत्यूपर्यंतचे जीवन विशिष्ट ध्येयाने व्यतीत करणे हितावह असल्याने आत्मानंदाप्रत पोचण्याची ही प्रक्रिया सोपी नसली तरी आवश्यक आहे. अशा वेळी भारतीय तत्त्वज्ञानातील अध्यात्मविचार साकल्याने समजून घेणे आवश्यक ठरते. शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाया गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ - अवेकनिंग यूंवर ब्लिस
महाभारतातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या जीवनावरील ही 'बेस्ट-सेलर' कादंबरी. मूळ महाभारत (भांडारकर आवृत्ती), नीळकंठी आवृत्ती आणि इतर असंख्य पुस्तकांचा सखोल अभ्यास करून लिहिलेली ही चित्तथरारक कादंबरी. महाभारतातले अनेक सुप्त पदर या कादंबरीत उलगडलेले आहेत.
Buy - Hard copy ebook Audio book
देव हे परग्रहावरील अतिमानव होते का? या संदर्भात वेदवाङ्मय कोणते निर्देश देतं? आकाशातून येणाऱ्या अवकाशयानांचे दिवे पाहून यानांच्या चालकांना 'देव' म्हटलं गेलं होतं का? रामायण, महाभारत, योगवासिष्ठ, समरांगण सूत्रधार इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये कोणते पुरावे लपले आहेत? इंका, माया, सुमेरियन, इजिप्शियन संस्कृती देवांच्या पृथ्वीवरील वास्तव्याचे कोणते पुरावे देतात? सप्तलोकांचं स्वरूप काय आहे? परमेश्वराचा प्रांत कसा आहे? मृत्यूनंतरचे जीवन कसं आहे? आनंदस्वरूप प्रांताचा स्पर्श होण्यासाठी काय केलं पाहिजे? या आणि अशा अनेक विषयांचा तौलनिक अभ्यासातून सिद्ध केलेलं सर्वस्वी अनोखं रसिकमान्य पुस्तक.
Buy - Hard copy ebook Audio book
फ्रेंच राज्यक्रांतीपासून सेंट हेलिनातील नेपोलियन बोनापार्टच्या अखेरीपर्यंत विशाल कालखंड रेखाटणारी नेपोलियन बोनापार्टच्या जीवनावरील 'बेस्ट-सेलर' कादंबरी. अनेक वृत्तपत्रांमधून 'आदर्श ऐतिहासिक कादंबरी' असं या कादंबरीचं परीक्षण केलं गेलं. डाव-प्रतिडाव, हेरगिरी, मुत्सद्दी खेळी, दगा-फटका, अनेक वैशिष्ट्यपूर्ण लढाया आणि विदारक वास्तव अशा अनेक अंगांनी समृद्ध झालेली थरारक कादंबरी
एक प्राचीन हस्तलिखित चिनी सैनिकांना तिबेटमध्ये सापडलं. भारतात एका गुप्त ठिकाणी असलेल्या अद्भुतरम्य वस्तूची माहिती त्यांना मिळाली. मग सुरू झाला एक जीवघेणा पाठलाग - बिंदूसरोवराच्या दिशेनं. कुठे होतं ते बिंदूसरोवर? कोणती रहस्यं लपली होती त्यात? वास्तवाकडून अद्भुततेकडे नेणारी आणि प्रतिक्षणी उत्कंठा वाढवणारी सर्वस्वी अनोखी कादंबरी.
भग्वदगीतेचे सिद्धान्त हे त्रिकालाबाधित आहेत. दुःख-संकटांवर मात करून अंतिम आनंदाचं ठिकाण गाठण्याचा मार्ग गीता प्रकाशित करते. प्राप्त जीवन कसं समृद्धपणे जगावं आणि आपला सर्वतोपरी उत्कर्ष कसा साधावा याचं गीता मार्गदर्शन करते. गीता अंधविश्वासाला थारा देत नाही. गीता तत्त्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. या ग्रंथासाठी गीतेवरील जवळपास ५० टीकांचा संदर्भ घेतला आहे. सरळ-सोपी बोली भाषा हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. अनेक नवे अर्थ, वेदोपनिषदांमधील संदर्भ, विज्ञान, भौतिक शोध, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, परमानसशास्त्र, पुराणकथा, अनेक दृष्टांत कथा तसंच अनेक देशी-विदेशी गोष्टींचा अंतर्भाव मूळ श्लोकांचा अर्थबोध होण्यासाठी या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे नवी पिढी हे 'गीताशास्त्र' सहज समजावून घेऊ शकते असं या ग्रंथाचं स्वरूप आहे.
Buy - Hard copy eBook Audio book
संपूर्ण भारतवर्षात सांस्कृतिक कार्याची प्रस्थापना करणाऱ्या अगस्त्य ऋषींच्या जीवनावरील अद्भुतरम्य कादंबरी. ‘प्रत्यक्ष देवांनाही हेवा वाटावा’ अशा ‘अगस्त्य ऋषींच्या’ समर्पित जीवनाला प्रकाशमान करणारी प्रेरक आणि अनुसरावी अशी गाथा. हा इतिहास कमीत कमी १०,००० वर्षांपूर्वीचा आहे.... देवांचं राजकारण, अगस्त्य ऋषींसारख्या ऋषींचं संस्कृतिप्रस्थापन कार्य, या कार्यात त्यांच्या समोर उभी ठाकलेली आव्हानं, 'सुर्य' देशातील राजकारण, कालकेय दानवांचा निःपात, रावणाचं अफाट सामरिक सामर्थ्य, त्याचं अवकाशस्थित 'सूर्यचक्र', रामाच्या अवतार कार्याचं प्रयोजन, सिद्ध अगस्त्य ऋषींनी केलेलं समुद्र प्राशन, नाडी ग्रंथाची निर्मिती, त्यामागचं वास्तव अशा अनेक घटनांनी नटलेली सर्वस्वी अनोखी कादंबरी
Buy - Hard copy eBook Audio book
उदयन-वासवदत्ता-पद्मावती या भारतातील प्राचीन कथानकावरील रससिद्ध कादंबरी. प्राचीन भारतातील हे तिसरं महाकाव्य मानलं गेलं आहे. वत्सदेशाचा संगीतकार राजा उदयन, कर्तव्यदक्ष अमात्य यौगंधरायण, स्वप्नसुंदरी वासवदत्ता, लावण्यवती पद्मावती, अहंमन्य राजा चंडमहासेन, निष्ठावान सेनापती रुमण्वन आणि हुशार विदूषक वसंतक यांच्यामधील हे सुंदर कथानक. डाव-प्रतिडाव, हेरगिरी, साम्राज्यस्पर्धा याबरोबरच प्राचीन भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही कादंबरी
मनुष्याला सर्वाधिक भीती वाटते ती मृत्यूची! मृत्यू शब्दाभोवती असणारं गूढ, अनेक प्रश्न, काळोख यांना भेद देणार्या आणि मृत्यूच्या दुसर्या बाजूवर प्रकाश टाकणार्या या विषयाची ताकद तितकीच मोठी आहे. जगातील सर्व विचारपद्धती, अभ्यासपद्धती, धर्मविचार तसंच विज्ञानाचा संदर्भ यांच्या आधारे मृत्यू आणि परलोक याविषयाची उकल या पुस्तकात तर्कशुद्ध पद्धतीने केलेली आहे. हा अगम्य-अनाकलनीय विषय सखोल तरीही अत्यंत साध्या-सहज भाषेत या पुस्तकात मांडला आहे.
चार्ली चॅप्लिन, लॉरेल-हार्डी, बस्टर किटन, हॅरोल्ड लॉइड यांच्यासह हॉलिवूडच्या ब्लॅक-कॉमेडी जमान्यातील आठ विनोदवीरांचं हृद्य चरित्रकथन
Buy - Hard copy eBook Audio book
प्रतिदिनी वाचन-चिंतन-मननासाठी अनेक संदर्भ घेऊन लिहिलेला ग्रंथ. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी ऐन रणांगणावर अर्जुनाला हे गीताकथन केलं आणि ‘कोहऽम’ ते ‘सोऽहम्’ हा परामार्ग प्रकाशित केला. मानवाचं सर्वार्थानं उन्नयन करणारं हेच गीतातत्त्वज्ञान 365 दिवसांमधे अनेक संदर्भग्रंथांचा आधार घेऊन सांगितलं आहे. स्व-विकासासाठी तसंच गीतेच्या अभ्यासकांसाठीसुद्धा हा ग्रंथ उपयुक्त आहे.
Buy - Hard copy Audio book
Gujarati translation of best-selling Marathi biographical novel on the life of Revered Pandurang Shastri Athavale, founder of Swadhyay Parivar. Rev. Pandurang Shastri (Dadaji) was an activist philosopher who formed the family of millions of Swadhayees World-wide. He was recipient of 100s of awards including Magsaysay award, Templeton Award, Gandhi award, Tilak award etc. This novel is entirely based on his life, thoughts and work. Mr. Kher had personal interviews with Rev. Dada ji within the period of over 3 years and then and then he wrote this novel.
Buy - Hard copy eBook Audio book
English translation of Biographical novel on the life of Revered Pandurang Shastri Athavale. Revered Pandurang Shastri (Dadaji) was an activist philosopher who formed the family of millions of Swadhayees World-wide. He was recipient of 100s of awards including Magsaysay award, Templeton Award, Gandhi award, Tilak award etc. This novel is entirely based on his life, thoughts and work. Mr. Kher had personal interviews with Rev. Dada ji within the period of over 3 years and then and then only he wrote this novel.
Who were the Gods? Were they super-humans who came to Earth from outside our solar system? What do the Inca, Maya, Sumer and Indian civilizations tell us of the existence of Gods? Empire of the Gods delves with defining insight into the proofs that exist in scientific research, the writings of eminent thinkers, as well as India’s ancient scriptures and epics, about the presence, activities and characters of the Gods. It also looks at how to attain the bliss promised by the Gods, the existence of an afterlife, and ways of meditation free from ritual. This deeply researched and riveting narrative casts the clear light of logical reason on areas and concepts we have perhaps only imagined.
Besides The Ramayana and The Mahabharata, there is a third epic of ancient India: the Bruhatkatha. Composed by scholar-poet-savant Gunadhya, it consisted the story of Udayan. Raised to be King, Udayan was taught the skills of the warrior as well as the craft of the statesman whose words hide his thoughts. But his soul belonged to the Goddess of Music. . . This is the epic tale of Udayan; his devoted Minister, Yaugandharayan; his fiercely loyal General, Rumanwan; and the brilliant Court Jester, Vasantak. It is also the story of Pradyot, proud King of Avanti, and Udayan's abduction of his vivacious and beautiful daughter, Vasavdatta.
This 'best-selling' novel on the life of Arjuna, the greatest archer of the Mahabharata. This engrossing novel is written after a thorough study of the original Mahabharata (Bhandarkar version, Neelkanthi) version and countless other books. Many hidden layers of Mahabharata are revealed in this novel.
Buy - Hard copy eBook
Hindi translation of best-selling Marathi biographical novel on the life of Revered Pandurang Shastri Athavale, founder of Swadhyay Parivar, who introduced universal way of life, way of worship and way of thinking to achieve spiritual height. Revered Pandurang Shastri (Dadaji) was an activist philosopher who formed the family of millions of Swadhayees World-wide. He was recipient of 100s of awards including Magsaysay award, Templeton Award, Gandhi award, Tilak award etc. This novel is entirely based on his life, thoughts and work. Mr. Kher had personal interviews with Rev. Dada ji within the period of over 3 years and then and then he wrote this novel.
Man is most afraid of death! The mystery that surrounds the word death, the many questions, the darkness, and the power of this subject to shed light on the other side of death is equally great. In this book, the subject of death and the afterlife is solved in a logical manner based on all the world's thinking, study methods, religious thoughts and the reference of science. This incomprehensible subject is presented in this book in a profound yet very simple language.
Super-natural thriller. . . An ancient manuscript was found by Chinese soldiers in Tibet. He came to know about a wonderful object in a secret place in India. Then began a deadly chase - in the direction of Bindusarovar. Where was Bindusarovar? What secrets were hidden in it? An absolutely unique novel that moves from the real to the fantastic and raises the anticipation.
Novelized form of the Bhagavad-Gita. This novel received great applause from readers and critics as well. In this novel efforts taken to transmit the divine message of Lord Sri Krishna, through beautiful scenes and their background, personal dialogues between Lord Krishna and Arjuna and all the relevant characters that provide a vivid spectrum of the ancient people and their lives, their costumes, different ways of behavior accompanied with mutual conversations and background of different social and political conditions, their prevailing caste systems, religion, the conflict between Kauravas and Pandavas,
पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचं चरित्र
Buy - Hard copy eBook Audio book
मेरा उपन्यास 'धनंजय' का यह गुजरती अनुवाद है। अर्जुन के जीवनपर मराठी में यह पहला उपन्यास था और अब गुजरातीमे भी पहला उपन्यास होगा। महाभारत में अर्जुन जैसा एकहि योद्धा नहीं है। ब्रह्मास्त्र, ऐन्द्रास्त्र, पाशुपतास्त्र जैसे अनेक अस्त्र थे। फिरभी वह शालीन था। इस अस्त्रोंका विनियोग उन्होंने गलत काम केलिए नहीं किया। इसीलिए कृष्ण को धर्मसंस्थापन केलिए अर्जुन का ही हाथ काम आया। महाभारत का वास्तविक दर्शन देनेवाली, मूल महाभारत के साथ ही अनेको ग्रंथोंका अभ्यास करके यह उपन्यास तथा नवलकथा लिखा है।
Buy - Hard copy eBook Audio book
Man is most afraid of death! The mystery that surrounds the word death, the many questions, the darkness, and the power of this subject to shed light on the other side of death is equally great. In this book, the subject of death and the afterlife is solved in a logical manner based on all the world's thinking, study methods, religious thoughts and the reference of science. This incomprehensible subject is presented in this book in a profound yet very simple language.
Buy - Hard copy eBook Audio book
Man is most afraid of death! The mystery that surrounds the word death, the many questions, the darkness, and the power of this subject to shed light on the other side of death is equally great. In this book, the subject of death and the afterlife is solved in a logical manner based on all the world's thinking, study methods, religious thoughts and the reference of science. This incomprehensible subject is presented in this book in a profound yet very simple language. Swasam Publications, Chennai
Buy - Hard copy
(Upcoming from Zumaya Publications, USA)
A book written with many references for daily reading-contemplation-meditation. About five thousand years ago, Lord Krishna recited this Gita to Arjuna on the battlefield and published the Paramarga from Koham to Soham. The same philosophy which elevates human beings in all aspects is told in 365 days with the support of many reference books. This book is useful for self-development as well as for students of Gita.
Buy - Hard copy eBook Audio book