'Bhavartha'- Interview by Prasad Mirasdar
आपण प्रत्येक जण आयुष्यात आनंदाच्या शोधात असतो. कुणी आपल्या कामात आनंद शोधतो.. कुणी घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवण्यात कुणी भटकंती करण्यात आणि कुणी काय तर कुणी काय.. पण खरंच आनंद म्हणजे काय? आनंदाचा शोध म्हणजे काय? आनंद हा आत्मिक असतो का? तो दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासात शोधावा का? अशा आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतायत प्रसिद्ध ऐतिहासिक, पौराणिक कादंबरीकार डॉ. राजेंद्र खेर! तुमच्या मनातील अशा प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. डॉ. राजेंद्र खेर यांनी आनंदाचं झाड, राम, देह झाला चंदनाचा अशी 15 पुस्तके लिहिली असून आध्यात्मिक - धार्मिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा अभ्यास असून भागवतगीतेवर त्यांचं लिखाण आणि मार्गदर्शन विशेष प्रसिद्ध आहे.
आस्तिकता आणि नास्तिकता हा कुठल्याही चर्चांचा कायम hot topic असतो, पण आस्तिक आणि नास्तिक कोणाला म्हणायचं? मंदिरात जाऊन पूजा करतो तोच आस्तिक आहे का? देव कशाला म्हणायचं? देव फक्त धार्मिक स्थळी आहे का? देव कुठे आणि कसा शोधायचा? भक्त कोणाला म्हणायचं? देवाप्रती प्रेम दाखवण्यासाठी उपवास करणं, नवस करणं दान करणं, सोनं देणं, संपत्ती देणं हाच मार्ग आहे का? या सगळ्यावर आपण डॉ. राजेंद्र खेर यांच्याशी संवाद साधला आहे.
सुरुवातीला क्रिकेटची कारकीर्द. नंतर चित्रपट आणि दूरदर्शनसाठी लेखन- दिग्दर्शन. आपले वडील, ख्यातनाम लेखक भा. द. खेर यांच्या आशीर्वादाने लेखन व प्रकाशन क्षेत्रात पदार्पण आणि यशस्वी वाटचाल. यांच्या अनेक पुस्तकांचे हिंदी, गुजराथी, इंग्रजी, मल्याळम् अनुवाद. परदेशी प्रकाशकही मिळाले. ईबुक, ऑडिओ बुक यांतही अग्रेसर. अनेक ठिकाणी व्याख्याने / प्रवचने.